अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला दोन आठवडे पूर्ण होत आहेत. पण, त्याच्या मृत्यूचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. सुशांतने डिप्रेशनमुळे आत्महत्या केली, असे मानले जात आहे. तर, बॉलिवूडमधील नेपोटीझममुळेच सुशांतचा बळी गेल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. सुशांतच्या अकाली मृत्युनंतर बॉलिवूडसह क्रिकेट जगताला धक्का बसला असून राजकीय वर्तुळातही चांगलीच चर्चा आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजद पक्षाचे नेते तेजस्वी यादव यानी, सुशांतसिंहच्या मृत्युचा सीबीआय तपास करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
सुशांतसिंहच्या मृत्युप्रकरणी राजद नेते तेजस्वी यादव आणि अभिनेता शेखर सुमन यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये, महाराष्ट्र सरकारने सुशांतच्या मृत्युप्रकरणाची निपक्ष चौकशी करुन हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा. याप्रकरणी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी महाराष्ट्र सरकारला संवाद साधावा. तसेच, राजगीर येथे होऊ घातलेल्या फिल्मसिटीला सुशांतसिंह राजपूतचे नाव देण्यात यावे, अशा विविध मागण्या या पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत.

#FilmCity #Sushantsinghrajput #Lokmatcnxfilmy #lokmat #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber